...

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात 263 जणांनी घेतला सहभाग

पुणे : मानवच्या कल्याणार्थ माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनद्वारे पुणे झोन मधील ब्रांच धायरी येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा (Sant Nirankari Charitable Foundation) रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन २५ करण्यात आले होते. त्यात २६३ भक्तांनी सहभाग घेतला. वाय. सी. एम. रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलन केले. (263 people mentioned in Sant Nirankari blood donation camp)

 

 

या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी ) यांच्या हस्ते झाले. मिशनचे सचिन जाधव, परमेश्वर हेळकर, पांडुरंग दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. (263 people mentioned in Sant Nirankari blood donation camp)

 

 

दरम्यान आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, संदीप बेलदरे, हरिदास चरवड, माजी नगरसेवक विकास नाना दांगट आदी मान्यवरांनी शिबिरास भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मिशनचे सेवादार , साधसंगत यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण केली. (263 people mentioned in Sant Nirankari blood donation camp)

 

 

 

धायरी विभागाचे प्रमुख शाम भागवत यांनी रक्तदान शिबिराला उपस्थिती तांचे आभार मानले. मिशनच्या वतीने ३६ वर्षांपासून निरंतर अशीच रक्तदानाची शृंखला चालू असून, त्यात आतापर्यंत ७ हजार ३६२ रक्तदान शिबीर घेण्यात आली. त्यात १२ लाख १६ हजार ६४९ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. (263 people mentioned in Sant Nirankari blood donation camp)

Local ad 1