अबब.. पुणे पुस्तक महोत्सवात २५ लाख पुस्तकांची खरेदी ; तब्बल ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल

पुणे : वाचनसंस्कृती सक्षम करण्यासाठी सुरू झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाने इतिहास रचला असून, यंदाच्या महोत्सवाला १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या नागरिकांनी तब्बल २५ लाख पुस्तके खरेदी केल्याने, पुस्तक महोत्सवातून ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही उलाढाल चौपट आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रेम दिल्याने, महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे (Rajesh Pandey, Chief Organizer of Pune Book Festival) यांनी रविवारी दिली. (25 lakh books purchase at Pune Book Festival)