...

महागाईने सामन्यांचे कंबरडे मोडले पण खासदारांचे तब्बल 24 टक्क्यांनी वेतन वाढले ! 

संसदेतील खासदारांचे वेतनात (MPs’ salaries) केवळ 24 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याता फायदा देशातील सुमारे 700 खासदारांना याचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे माजी खासदारांनाही फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी  2018 मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटली (The then Union Finance Minister Arun Jaitley) यांनी खासदारांचे वेतन 50 हजारांहून 1 लाख करण्यात आले  होते. त्याचवेळी खासदारांचे वेतन आणि भत्त्यांसंदर्भात पुनरावलोकन प्रणाली तयार केली आहे. (The salaries of 700 MPs in the country have been increased by 24 percent !)

 

सरकार घाशिराम कोतवाल चालवत आहेत का ? : हर्षवर्धन सपकाळ

 
महागाईने त्रास असलेल्या सर्व सामान्य नागरीक असून, सरकार महागाईला नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र, खासदारांचे वेतनात व मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्यात आले आहे. खासदारांचे वेतन महागाईच्या निर्देशांकावर आधारित खासदारांच्या वेतनात वाढ केले जाते. त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले आहे. आता खासदाराला प्रति महिना एक लाख 24 हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच महिना 87 हजार रुपये मतदारसंघ भत्ता मिळणार आहे. हा भत्ता पूरक्वी 70 हजार रुपये होता. 75 हजार रुपयांच्या कार्यालय खर्चामध्ये 50 हजार रुपये सहाय्यक कर्मचारी व 25 हजार रुपये स्टेशनरी आणि अन्य गोष्टीसाठी दिले जातात. 
 

वेेतनाशिवाय इतर कोणत्या सुविधा मिळतात ? – What other benefits are available besides salary?

सरकारी वाहन, चालक, सहाय्यक करर्मचारी, कुटुंबीयांना मर्यादित प्रवास सुविधा, दिल्लीत मोफत सरकारी निवास, सीजीएचएस रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, संसदेतील कॅटिनमध्ये सवलतीच्या दरात जेवण आणि माजी खासदारांना मोफत एसी सेकंड क्लास प्रवास करता येतो. 
 

खासदारांना अन्य सुविधा मिळतात..

खासदारांना आपल्या कामासाठी 1 लाख रुपयांचे फर्निचर खरेदी करण्याचा तसेच 25 हजार रुपयांचे अन्य फर्निचर खरेदी करता येते. यापूर्वी फर्निचरसाठी 80 हजार रुपये आणि फर्निचरसाठी 20 हजार रुपये खर्च करता येते होते. खासदारांना विविध प्रकारची निवासव्यवस्था पुरविली जाते. 
 

दिल्ली मिळणार घर कसे असते ?

विठ्ठलभाई पटेल हाऊसच्या हाॅस्टेलपासून दिल्लीतील दोन – बेडरुमचे फ्लॅट, बंगला, असे त्यांचे स्वरूप असते. त्यांना वीज, पाणी, टेलिफोन आणि इंटरनेट शुल्क दिले जाते. खासादारांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी दिल्लीत येण्याकरिता त्यांच्या मतदारसंघातून 34 वन -वे विमान तिकिटांचे भाडे, रेल्वे प्रवासासाठीही सोय उपलब्ध करुन दिली जाते.

खासदारांना मिळणारे वेतन आणि भत्ते ? – What are the salaries and allowances received by MPs?

पगार  – एक लाख 24 हजार रुपये दरमहा
अधिवेशन उपस्थिती भत्ता  – 2500 रुपये
प्रवास भत्ता  – रस्ते मार्ग 16 रुपये प्रति किलोमीटर , मोफत विमान व रेल्वे प्रवास
मतदारसंघ भत्ता  – 87 हजार रुपये
कार्यालयीन खर्च –  75 हजार रुपये
वेद्यकीय सेवा भत्ता  – 500 रुपये
फोन, इंटरनेट –  1,50,000 मोफ काॅल्स मोफत वर्षाला
वीज – 50,000 युनीट वीज मोफ्त वर्षाला
पाणी  – 4,000 किलोलिटर पाणी मोफ्त
Local ad 1