पुणे जिल्हा परिषद सदस्य असलेले 24 जण झाले आमदार : खासदार शरद पवार

पुणे : पुणे जिल्हा परिषदेमधून (Pune Zilla Parishad) आतापर्यंत २४ जिल्हा परिषद सदस्य आमदार तर ५ सदस्य मंत्री झाले आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन नेतृत्वाची फळी राज्यात निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी केले. (24 members of Pune Zilla Parishad became MLAs : Sharad Pawar)

 

 

 

पुणे जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सव समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुन बेनके, सुनील टिंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. (24 members of Pune Zilla Parishad became MLAs : Sharad Pawar)

 

 

 

जिल्हा परिषदेची इमारत अत्यंत चांगली आहे. या इमारतीमधून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल होणारे काम व्हावे. महिलांना आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची संख्या वाढली आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. पुणे जिल्हा परिषदेने ६० वर्षात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. (24 members of Pune Zilla Parishad became MLAs : Sharad Pawar)

Local ad 1