धक्कादायक : नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यात 31 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

Farmer Suicide : मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून तब्बल 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 65 शेतकऱ्यांनी तर, हिंगोली जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केली आहे. (214 farmers committed suicide in Marathwada in three months)

 

 

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आधी अतिवृष्टी आणि आता त्यानंतर अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिके वाहून गेली. काही ठिकाणी तर शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे झालेल्या या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. (214 farmers suicide in Marathwada in three months)

 

Pot Kharab Jamin । पुणे जिल्ह्यात ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली

 

नुकसान होऊन सरकारची मदत अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, बँकेकडून सतत सुरु असलेला तगादा, पैश्यासाठी सावकाराकडून होणारी मागणी आणि त्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कुटुंब चालवण्याची चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. गेल्या तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. (214 farmers suicide in Marathwada in three months)

राज्य भूमि अभिलेख विभाग टाकतोय कात ; कोणकोणत्या सुविधा मिळतायेत ऑनलाईन

 

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 23, जालना 15, परभणी 18, हिंगोली 5, नांदेड 31, बीड 65, लातूर 14 आणि धाराशिव 43 असे एकूण 214 शेतकरी आत्महत्या केल्या आहेत. (214 farmers suicide in Marathwada in three months)
Local ad 1