...

कार्यालयीन सहकार्याच्या प्रवास भत्याचा धनादेश देण्यासाठी 20 टक्के रकमेची ; लाच स्वीकारताना दोन लिपिक  ACB च्या जाळ्यात

बीड : लघु पाटबंधारे विभागात असलेल्या कर्मचाऱ्याचा प्रवास  भत्याचा 19 हजार 410 धनादेश देणायासाठी 20 टक्के म्हणजेच 3 हजार 882 रुपयांची दोन लिपिकांनी मागणी केली. परंतु, तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नव्हती. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB)  तक्रार केली. 3 हजार 880 रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक आणि वरिष्ठ लिपिकाला अटक करण्यात आली. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे. (20 percent demand for travel allowance cheque; Two in the net of ACB while taking bribe)

 

सविस्तर ट्रॅप

▶️ युनिट  – बीड

▶️ तक्रारदार –  पुरुष लोकसेवक, वय- 32 वर्ष

▶️ आरोपी – 1) कुंदन अशोक गायकवाड, प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद.
2) पोपट श्रीधर गरुड, वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड ( वर्ग -3)

➡️  लाचमागणी पडताळणी दिनांक  – 24/04/2023

➡️ लाच मागणी – रू. 3882/-

▶️ लाच स्वीकृती दिनांक – 24/04/2023

▶️ लाच स्वीकारली – रू 3880/-
▶️  कारण – तक्रारदार लोकसेवक यांचे प्रवास भत्ता देयकाचा 19410 रुपयांचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून आलोसे क्र 1 यांनी फोनवर 2000 रु लाचेची मागणी केली व आलोसे क्र. 2 यांनी तक्रारदार यांना मंजूर झालेला  19410 रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः व आलोसे क्र.1 यांचे मिळून एकत्रित असे 20% प्रमाणे लाच रक्कम 3882 रु मागणी करून  तडजोडअंती 3880 रु स्विकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांना 19410 रु चा धनादेश देण्यासाठी आलोसे क्र 2 यांनी 3880 रु ची लाच रक्कम लघु पाटबंधारे उपविभाग आष्टी या कार्यालयात स्विकारताच लाच रकमेसह पंच व साक्षिदार समक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे आष्टी येथे गुन्हा दाखल करत आहोत.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी – शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.बीड. मो.क्र 9355100100

▶️मार्गदर्शक- संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद 9923023361
विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद 8788644994

➡️सापळा पथक – पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड , अमोल खरसाडे  गणेश मेहेत्रे
ला. प्र. वि, बीड.

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद : 9923023361 यावर संपर्क साधावा.

Local ad 1