नांदेड उत्पादन शुल्क विभागाची बेकायदा मद्यविक्रीविरोधात धडक मोहिम, विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : राज्य उत्पादक शुल्क (State excise duty) देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (20 lakh rupees worth of liquor seized in various operations)
धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले 1 हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात 2 ठिकाणी जप्त केला आहे. या गुन्ह्यात 3 आरोपीला ताब्यात घेतले असून, त्यांना तीन दिवसाची कोठडी मिळाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक ए. एम. पठाण हे करीत आहेत.
Related Posts