नांदेड लोकसभेसाठी 19 तर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी 165 उमेदवार रिंगणात

नांदेड । नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघाराचा आज शेवटचा दिवस होता. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 20 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 19 उमेदवार रिंगणात आहेत. तर जिल्ह्यातील 458 वैध उमेदवारांपैकी 293 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 165 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (19 candidates for Nanded Lok Sabha and 165 candidates for 9 assembly constituencies)

 

 

भोकर विधानसभा मतदार संघाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष ! उमेदवारी अर्ज माघारीनंतर किती EVM लागणार स्पष्ट होणार 

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात 72 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 39 उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली आहे. त्यामुळे आता तेथे 33 उमेदवार रिंगणात आहेत. किनवट विधानसभा मतदारसंघात 29 जणांनी अर्ज भरले होते. त्यातील 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे 17 उमेदवार रिंगणात आहेत.  हदगाव विधानसभा मतदारसंघात 63 उमेदवार रिंगणात होते. तेथे 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 24 उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 51 उमेदवार रिंगणात होते. तेथे 31 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 20 उमेदवार रिंगणात आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघात 33 उमेदवार रिंगणात होते. तेथे 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अर्ज मागे घेतले असून 14 उमेदवार रिंगणात आहेत.

 

 

How To Lock-Unlock Aadhaar Card Process In Marathi।आधार कार्ड लॉक-अनलॉक कसे कराल ? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

 

नायगाव विधानसभा मतदारसंघात 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 10 उमेदवार रिंगणात आहेत. देगलूर विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवार होते. तेथे 16 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आता 11 उमेदवार रिंगणात आहेत. मुखेड विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 6 जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने तेथे 11 उमेदवार रिंगणात आहेत. भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 115 उमेदवारांनी माघार घेतली असून, 25 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. भोकर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातुन सर्वाधिक 140 इच्छुक उमेदवारांपैकी 115 उमेदवारांनी माघार घेतली असून 25 उमेदवार निवडणूक रिंगणात  आहेत. यात 14 उमेदवार विविध पक्षातर्फे तर 11 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. लढत मुख्यतः महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे तिरुपती कोंढेकर, महायुती तर्फे भाजपच्या श्रीजया चव्हाण, वंचित बहुजन आघाडी तर्फे सुरेश राठोड तर अपक्ष उमेदवार नागनाथ घिसेवाड यांच्यात प्रामुख्याने होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात 458 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 293 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता 185 उमेदवार रिंगणात आहेत.

19 candidates for Nanded Lok Sabha

Local ad 1