...

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 1680 जण इच्छूक ; पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती

 

पुणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharad Chandra Pawar Party)  विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी 1680 इच्छुकांनी अर्ज केलेला आहे. मंगळवारी आणि बुधवारी पुण्यात  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील (Marathwada, West Maharashtra, Vidarbha and North Maharashtra) सुमारे  1280 इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत. तर मुंबई आणि कोकणातील 400 इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी घेतल्या आहेत, अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या  कार्यअध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule, working president of NCP Sharad Chandra Pawar party) यांनी दिली.

 

 

 दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली.अजीत पवार यांच्या सोबत गेलाला राज्यातील एका माजी मंत्री असल्याची माहिती समोर येत आहे.  (1680 people are willing to contest assembly election from NCP Sharad Chandra Pawar party; Interviews of aspirants in Pune)

 

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी गाठीभेटी, मुलाखती, दौरे, पक्षप्रवेश यांना वेग आला आहे, अशातच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्या नेत्यांची संख्या देखील हळूहळू वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. मंगळवारी मोदी बागेत सकाळी एका मोठ्या व्यक्तींनी शरद पवारांची भेट घेतली. ही मोठी व्यक्ती कोण आहे, त्याची चर्चा आता रंगली आहे. सुप्रिया सुळेंच्या गाडीत जाताना त्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला होता. त्यामळे हे अजीत पवार यांच्या पक्षातील राजेंद्र शिंगणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी फॉर्म भरले आहेत, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्याच्या मुलाखती होणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि उच्चशिक्षित लोक मुलाखतीसाठी आलेले आहेत ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना तिकीट देणे शक्य नाही काही नाराज होतील पण आम्ही संघटनेमध्ये पूर्ण ताकतीने त्यांना जबाबदारी देऊ. पंचायत राज इलेक्शन आमच्या सरकार आल्यावर आम्ही तातडीने घेऊ आणि त्या लोकांना जबाबदाऱ्या देऊ. प्रत्येक जणांचे मेरिट बघून त्यांना संघटनेत किंवा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधान्याने जबाबदारी देऊ, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाले.

 

मुळात तुम्ही 2014 पासून पाहा, जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा असे नेते निवडणूक लढण्यासाठी पक्षांतर करतात. हे कधी होतं, जेव्हा मतदारसंघ आपल्याला भेटणार नाही. तेव्हा ज्यांना आमदार व्हायचे असते ते इतर पक्षाचे दार ठोठावत असतात. ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार नाहीत, त्यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात. – अजित पवार, उपमुख्यमंत्री.

 

बारामतीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची चर्चा असताना पक्षाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत मात्र ते सहभागी झालेले नाहीत. त्यांच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Local ad 1