पुणे : राज्यातील 3 हजार 373 परिक्षा केंद्रावर मंगळवारपासून 12 वीच्या परीक्षा सुरु होणार आहे. ही परिक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2015 कालावधीत होत आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले, तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत. यंदा 37 तृतीयपंथी विद्यार्थ्यी यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. प्रत्येक परिक्षा केद्रांवर बैठे पथक असणार आहे. तसेच ड्रोन,ची नजर ही असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (15 lakh students will appear for 12th exam)