(Corona affected) नांदेड जिल्ह्यात आढळले 15 कोरोना बाधित

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 774 अहवालापैकी 15 संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे नांदेडकरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे. 15 corona affected in Nanded district

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 885 एवढी झाली असून यातील 87 हजार 918 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 529 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 11 जून 2021 रोजी गोदावरी कोविड रुग्णालयात पाटबंधारे नगर नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा तर 12 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे इंदिरानगर अर्धापूर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 15 corona affected in Nanded district

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 897 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, लोहा तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, हिमायतनगर 1, नायगाव 1, कंधार 1, हिंगोली 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 1, कंधार 1, लातूर 1 असे एकूण 15 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 46 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. 15 corona affected in Nanded district

Local ad 1