...

(1330 corona patients) अबब… नांदेड जिल्ह्यात 1330 कोरोना रुग्ण अढळले

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू होणार असून, त्यात अनेक निर्बंध असणार आहेत. त्यामुळे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे मंगळवारी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. (1330 corona patients)

कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवारी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवारी 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे. (1330 corona patients)

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून, यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 144 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (1330 corona patients, today corona update in nanded)


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 307, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 5, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, किनवट कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 21, मुखेड 9, माहूर कोविड केअर सेंटर 8, उमरी तालुक्यांतर्गत 20, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 438 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के आहे. (1330 corona patients)


330 corona patients
330 corona patients

जिल्ह्यात 7 हजार 144 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 226, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 153, देगलूर कोविड रुग्णालय 52, हदगाव कोविड रुग्णालय 16, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 28, महसूल कोविड केअर सेंटर 126, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 399, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 199, खाजगी रुग्णालय 514 आहेत. (1330 corona patients)


Local ad 1