बीडच्या राजकारणात भुकंप : भाजपच्या 25 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे (Resigned)

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल केले असून, त्यात महाराष्ट्रातातून चौघांना संधी दिली आहे. बीडच्या  खासदार डाॅ. प्रितम मुंडे (MP pritam munde) यांचे नाव चर्चेत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना मंत्री पदासंधी देण्यात आली नाही. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे देत आहेत. आतापर्यंत 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. (11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet)

खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रतिम मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होत. त्यावर पंकजा मुंडे यांनी मी नाराज नसल्याचे माध्यमांसमोर येऊन सांगितले. पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असा अंदाज बांधला जात होता. बीड जिल्ह्यातील मुंडे भगिनींचे समर्थक असलेले भाजप पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे. 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा देण्यापूर्वी येथे एकूण 14 भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. 11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. 11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet

राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नाहीत

 खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने मुंडे समर्थक नाराज असल्याचं स्पष्ट झाले आहे. बीडमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नाही, असा आरोप केला आहे. 11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet

Local ad 1