पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) घेतली. या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे.(10th Result Date Announced; Know when)
सोमवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
दहाविच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण ऑनलाइन निकालात पाहता येतील. तसंच निकालीची छापील प्रतही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर माहिती सविस्तर उपलब्ध होईल. शाळा आणि संस्थांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.