...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ । पुणे जिल्ह्यातील 109 उमेदवार छाननीमध्ये निवडणुकी बाहेर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४पुणे, शहरासह जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघासाठी 757 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या अर्जांची छाननी बुधवारी झाली. त्यात 109 अर्ज बाद ठरले आहेत. तर 648 अर्ज वैध ठरले आहेत. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार हे स्पष्ठ होणार आहे. (109 applications in Pune district were declared invalid)

 

पर्वती विधानसभा मतदार संघात समान नावाचे चार उमेदवार

 

जिल्ह्यातील सर्व 21 विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता अर्जाची छाननीला सुरुवात झाली. 757 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केला होता. त्यात जुन्नर विधानसभा मतदार संघात 17 अर्ज दाखल झााले होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरली आहेत. आंबोगाव मतदार संघासाछी 31 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 5 अर्ज अवैध ठरली असून, 25 अर्ज  वैध ठरली. खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात दाखल झालेल्या 34 पैकी 29 अर्ज वैध ठरली . तर 6 अर्ज बाद ठरली आहेत. (109 applications in Pune district were declared invalid)

 

  Assembly Election Voting । 12 पैकी कोणताही एक पुरावा असेल तरच करता येईल 

 
दौंडमध्ये 22 पैकी 20 अर्ज वैध ठरली असून, 2 अर्ज अवैध ठरली आहेत. इंदापूरमध्ये 52 पैकी 46 वैध तर 6 अर्ज बाद ठरली. बारामती मध्ये 46 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 4 अर्ज अवैध ठरली असून, 36 अर्ज वैध ठरली. पुरंदरमधील 40 पैकी 7 अर्ज बाद झाली असून,  33 अर्ज वैध ठरली. भोर विधानसभा मतदार संघात 11 अर्ज अवैध  तर 20  अर्ज वैध ठरली. मावळमध्ये 26 पैकी 9 अर्ज बाद ठरले आहेत. चिंचवडमधील 44 पैकी 39 अर्ज वैध तर 5 बाद, पिंपरीत 4 अर्ज अवैध तर 41 अर्ज वैध ठरले. भोसरीमध्ये 8 अर्ज अवैध तर 25 अर्ज वैध ठरले आहेत. 

 

E- KYC Mandatory for Ration Card। रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; KYC करा अन्यथा धान्य मिळणे होईल बंद

 
पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 32 अर्ज वैध तर 2 अर्ज  छाननीमध्ये अवैध ठरली. शिवाजीनगरमध्ये 26 वैध, 4 अर्ज अवैध ठरले. कोथरुडमध्ये 36 पैकी 4 अर्ज अवैध, खडकवसाला 39 पैकी 8 अवैध, पर्वती37 पैकी 5 अवैध, पुणे कॅन्टोन्मेंट 38 पैकी 2 आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघात 29 अर्जांपैकी 7 छाननीमध्ये अवैध ठरली आहेत. (109 applications in Pune district were declared invalid)
Local ad 1