Nanded corona update । नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

Nanded corona update । नांदेड : सोमवारी प्राप्त झालेल्या 720 अहवालापैकी 10 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात संपूर्ण दहा अहवाल आरटीपीसीआर तपासणीद्वारे अहवाल बाधित आले. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चिंता वाढली आहे. (10 persons infected with corona in Nanded district)

 

MahaDBT portal। विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 90 हजार 572 एवढी झाली असून, यातील 87 हजार 885 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या 32 असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये  उपचार सुरु आहेत. त्यातील दोघांची बाधितांची प्रकृती गंभीर आहे. (10 persons infected with corona in Nanded district)

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, नायगाव तालुक्यातंर्गत 1, ठाणे 1 असे एकुण 10 बाधित आढळले आहे. जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 21, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 32 व्यक्ती उपचार घेत आहेत. (10 persons infected with corona in Nanded district)

Local ad 1