पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी‘ अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियाना अंतर्गत एका दिवसात १ लाख ८१ हजार ३७६ नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिली. (In one day, 1 lakh 81 thousand citizens will benefit from the ‘Sasan Apya Dari’ campaign)
अभियानांतर्गत जिल्ह्याला ७५ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरुन घेतले. (In one day, 1 lakh 81 thousand citizens will benefit from the ‘Sasan Apya Dari’ campaign)
तालुकानिहाय नागरिकांनी घेतलेला लाभ
या विभागातील योजनांचा दिला लाभ
शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र, विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड, निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.
सूक्ष्म नियोजनावर भर