डेल्टा प्लस व्हेरियंटवर ९८ रुग्णांनी केली मात

पुणे : कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने घेऊन जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी केली जात आहे. त्यात राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत १०३ डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले असून, (So far, 103 Delta Plus variants have been detected in the state) त्यातील ४९ रुग्णांना सौम्य लक्षणे होती. आतापर्यंत ९८ रुग्ण बरे झाले आहेत, (Delta Plus variant was defeated by 98 patients) अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

 

कोविड १९ प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोविड विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी करण्यात येते. इन्स्टिटयुट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेने राज्यात आणखी २७ डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. (So far, 103 Delta Plus variants have been detected in the state) नव्याने आढळलेल्या २७ डेल्टा प्लस रुग्णांपैकी प्रत्येकी ६ रुग्ण अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील आहेत तर ५ रुग्ण नागपूर ४ रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.

 

यवतमाळ जिल्ह्यात ३ नाशिक मध्ये १ तर भंडारा जिल्ह्यात १ रुग्ण आढळून आला आहे. हे २७ रुग्ण कोविड १९ आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत, (Out of the 27 newly discovered Delta Plus patients, 6 patients each are from Amravati and Gadchiroli districts while 5 patients are from Nagpur and 4 patients are from Ahmednagar district. 3 patients have been found in Yavatmal district, 1 in Nashik and 1 in Bhandara district. These 27 patients have completely recovered from 19 diseases) अशी माहिती देण्यात आली.

१०३ रुग्णांपकी ५ जणांचे मृत्यू ( ३ पुरुष, २ स्त्रिया) झाले आहेत. २ मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात तर प्रत्येकी १ मृत्यू बीड, मुंबई आणि रायगड येथे झाला आहे. मृत्यू झालेले ५ ही रुग्ण हे ६५ वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते. या ५ जणांपैकी २ जणांनी कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते, तर तिघांनी कोणतीही लस घेतलेली नव्हती. विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भिती न बाळगता कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (So far, 103 Delta Plus variants have been detected in the state)

 

Local ad 1