Counselor Appointed : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण (Latur, Aurangabad, Amravati, Pune, Nagpur, Mumbai, Kolhapur, Nashik, Konkan) या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.
भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 7387400970,8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 8999923229, 9321315928, 7387647102, 8767753069 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.