...

पूजाचा फोन आणि लॅपटॉप द्या, पोलिसांची नगरसेवक घोगरेंना नोटीस (Give Pooja’s phone and laptop, notice to police corporator Ghogare)

पुणे : पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असून, या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, दिवसेंदिवस हे प्रकरण धक्कादायक वळणे घेत आहे. आता पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. त्यामुळे घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. (Give Pooja’s phone and laptop, notice to police corporator Ghogare)

गेल्या काही दिवसांपासून भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल असल्याची चर्चा आहे. याच पुराव्याच्या जोरावर भाजपकडून पूजा चव्हाण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. आता मात्र घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप असल्याचा थेट संशय पुणे पोलिसांना आहे. याचमुळे पुणे पोलिसांना पोलिसांना पूजाचा लॅपटॉप आणून द्या, असे फर्मान नोटीसद्वारे पोलिसांनी सोडले आहे. मृत पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे धनराज घोगरे यांनी स्पष्ट केले आहे. (Give Pooja’s phone and laptop, notice to police corporator Ghogare)

 वानवडी येथे पूजा चव्हाणचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. त्यावेळी नगरसेवक घोगरे घटनास्थळी उपस्थित होते. घोगरे यांनी सांगितले की, वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याने मला कळाले तसा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिला उचलून मी रिक्षात ठेवले. आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व गोष्टी ताब्यात घेतल्याचेही घगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Give Pooja’s phone and laptop, notice to police corporator Ghogare)

Local ad 1