निलेश आल्हाट यांचा सन्मान

पुणे : राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल (Lal Mahal) येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मास्क व सॅनीटायझर वाटप करण्यात आले. तसेच निलेश आल्हाट (Nilesh Alhat) यांचा सन्मान करण्यात आला.

 

निलेश आल्हाट (Nilesh Alhat) यांनी कोरोनाच केलेल्या कामाची दखल घेत मराठा सेवा संघाच्या वतीने बाबाराजे भोसले (थेट वंशज -व्यंकोजी राजे भोसले तामिळनाडू) व माजी जलसंपदामंत्री तथा आमदार प्रा.तानाजी सावंत सर यांच्या हस्ते विशेष सन्मान करून गौरविण्यात आले.

 

 

यावेळी नगरसेवक योगेश समेळ, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिनभाऊ आडेकर, राजेंद्र कुंजीर, माजी नगरसेविका निताताई राजपूत, सुमनताई कुसळे, राजेंद्र बलकवडे, डॉ. चंद्रकांत कुंजीर, हनुमंत पपूल (रिपब्लिकन सेना माथाडी जनरल कामगार संघटना नेते), सिमाताई महाडीक, हर्षवर्धन मगदूम, वंदनाताई इंदापूरकर, शिवाजीराव कुसळे, प्रफुलताताई वडके, आरतीताई घुले, अनुसयाताई घोडके, स्वातीताई अंदुरे, नंदाताई कवळे, अण्णा तळेकर, फुले. शाहू. आंबेडकर. अण्णा. विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद साठे आदी उपस्थित होते.

Local ad 1