डहाणू-तलासरीमध्ये भूकंपाचे धक्के। Earthquake tremors in Dahanu-Talasari

Earthquake tremors in Dahanu-Talasari । पालघर : जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) आणि तलासरी (Talasari) तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी (27 मे) एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता (Earthquake Intensity) कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

Transfers of 45 Naib Tehsildars in Pune Division । पुणे विभागातील 45 नायब तहसीलदारांच्या बदल्या

 

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावं पुन्हा हादरली आहेत. मागील काही वर्षांपासून डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र, शनिवारी लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 5 वाजून 16 मिनिटांला 3.5 रिश्टर स्केलचा, तर 5 वाजून 24 मिनिटांनी जाणवलेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. (Earthquake tremors in Dahanu-Talasari)

Local ad 1