पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांचे फोटो वापरुन त्यांच्याच नावाने बनावट फेसबुक अंकाऊंट (Facebook account) तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. हा प्रकार यापूर्वी दोन वेळा घडला असून, त्याची सायबर सेलकडे (Cyber cell) तक्रार करण्यात आली आहे. परत पुन्हा एकदा हा प्रकार उघडकीस आला आहे. फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्विकारू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.
फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाऊंट माझे नाही. त्यामुळे येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट चा स्विकार नाका, असे आवाहन डाॅ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
दररोज सायबर गुन्हेगारांकडून विविध प्रकारे सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसात नोंदही केली जाते. परंतु हे प्रकार थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा घडला आहे.