...

औरंगाबादमध्ये दोन पीएसआय एकाच दिवशी एसीबीच्या जाळ्यात : पोलिस दलात एकच खळबळ

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात (Aurangabad city) एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातील दोन पोलिस निरिक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सिडको पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक (ग्रेड PSI) नितिन दशरथ मोरे (PSI Nitin Dashrath More) याने गुन्ह्यात आरोपी न करण्यास 20 हजार  रुपयांची मागणी करुन 12 हजार रुपये स्विकारताना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत सातारा पोलीस स्टेशनमध्ये लीस उप निरीक्षक (ग्रेड psi) मच्छिंद्र बापूराव ससाणे (psi Machindra Bapurao Sasane) (वय 55 वर्ष) गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करुन 24 हजार हजार रुपये स्विकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली. या दोन घटनांमुळे औरंगाबाद पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. (Two PSIs in Aurangabad city in ACB net on same day)

 

Maharashtra Board HSC Results 2023 live । बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा 91 टक्के निकाल

पहिला घटना

  • युनिट  – औरंगाबाद
  • तक्रारदार – पुरुष, वय-47 वर्ष
  • आरोपी – नितिन दशरथ  मोरे, पोलिस उपनिरीक्षक (ग्रेड PSI), नेमणूक – पो स्टे सिडको, औरंगाबाद शहर
  • लाच मागणी दिनांक  – 24/05/2023
  • लाच मागणी रक्कम – सुरवातीस 20000/- रुपये, तडजोडी अंती 12000/- रुपये
  • लाच स्वीकृती दिनांक व रक्कम – 12000/- रुपये, दिनांक 25/05/2023
  •   कारण –  यातील तक्रारदार व त्यांचे मित्र यांचे विरुद्ध दाखल तक्रारी अर्जात तक्रारदार यांचेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी व सदर तक्रारी अर्जात गुन्हा दाखल झाल्यास तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी  यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना 20000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 12000/- रुपयाची पंचासमक्ष मागणी करून सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम स्वतः स्विकारली म्हणून आलोसे   यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • सापळा अधिकारी – पोलीस निरीक्षक हनुमंत वारे,ला.प्र.वि.औरंगाबाद. मो. 8805102555
  • मार्गदर्शक- संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद. मो.9923023361
  •  विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. 8788644994
  • मारुती पंडीत, पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.मो 9764006765
  •   सापळा पथक – पोना साईनाथ तोडकर, पो.ना. विलास  चव्हाण, पो.ना. राजेंद्र शिनकर
 भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-* 9923023361 संपर्क साधावा

दुसरी घटना

  • युनिट  – औरंगाबाद
  • तक्रारदार- पुरुष,वय- 32 वर्ष
  • आरोपी लोकसेवक –  मच्छिंद्र बापूराव ससाणे, वय 55 वर्ष, व्यवसाय नोकरी, पोलीस उप निरीक्षक (ग्रेड psi), नेमणूक सातारा पोलीस स्टेशन, औरंगाबाद शहर
  •  लाच मागणी दिनांक –  25/05/2023
  • लाच स्वीकृती दिनांक –  25/05/2023
  • लाचेची मागणी – 24,000/-
  • लाच स्वीकृती – 24,000/-
  •  कारण –  तक्रारदार व इतर  यांच्या विरुद्ध सातारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे यांच्याकडे होता. सदर गुन्ह्यात आलोसे यांनी तक्रारदार यांना मदत करण्यासाठी 25000/- रुपये  मागणी करून तडजोडीअंती 24000/- रुपये  स्वीकारण्याचे मान्य करून पंचा समक्ष लाचेची रक्कम  24000/- रुपये स्वीकारली.
  • सापळा अधिकारी, – संदीप राजपूत, पोलीस निरीक्षक*, ला प्र वि औरंगाबाद. 9823235777
  • मार्गदर्शक- संदीप आटोळे पोलीस अधीक्षक,* ला.प्र.वि.औरंगाबाद. 9923023361
  • विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, (Addl SP Vishal Khambe) ला.प्र.वि. औरंगाबाद. 8788644994
  •  मारुती पंडित,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.
  • सापळा पथक – पो अ केवलसिंग  गुसिंगे, बाळासाहेब राठोड, दत्तात्रेय होरकटे
Local ad 1