...

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर गुजरातमध्ये भाजप गड कायम

Himachal Pradesh Election Result 2022 : गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे (Himachal Pradesh Election) सुरुवातीचे कल आता हाती येत आहेत. गुजरातमध्ये भाजप (BJP) तर हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली आहे. (Congress will lead in Himachal Pradesh, while BJP will remain in power in Gujarat)

 

सध्या सातत्याने विधानसभा निवडणुकांचे आकडे बदलत असून, हिमाचल प्रदेशमधील आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. तसेच तीन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. त्या ठिकाणी बहुमताचा आकडा 35 चा आहे. सध्या विचार केला तर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अद्याप संपूर्ण निकाल हाती आलेला नाही. काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये भाजपला धक्का देत काँग्रेस सत्ता मिळवेल, असे  चित्र बोलले जात आहे. (Congress will lead in Himachal Pradesh, while BJP will remain in power in Gujarat)

 

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Himachal Chief Minister Jairam Thakur) सहाव्यांदा सिराज मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री जयराम ठाकूर या मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री जयराम यांची पुन्हा काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांच्याशी लढत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांचा 11,254 मतांच्या फरकाने पराभव केला होता.

 

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे शिमला ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत विक्रमादित्य सिंह विजयी झाले. तर, भाजपने येरवी मेहता यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास विक्रमादित्य सिंह हे मुख्यमंत्री होऊ शकतात. (Congress will lead in Himachal Pradesh, while BJP will remain in power in Gujarat)

 

 

काँग्रेसचे नेते मुकेश अग्निहोत्री हे सध्या हिमाचल प्रदेशमधील हरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत ते विजयाची हॅट्रिक साधणार का, हे पाहावे लागणार आहे. (Congress will lead in Himachal Pradesh, while BJP will remain in power in Gujarat)

 

थिओग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) राकेश सिंघा आहेत. यावेळी त्यांना काँग्रेस आणि भाजपच नव्हे तर आम आदमी पक्षाचेही  आव्हान आहे. या मतदारसंघात सीपीआयएम, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. (Congress will lead in Himachal Pradesh, while BJP will remain in power in Gujarat)

 

हिमाचल प्रदेशातील डलहौसी विधानसभा जागेवर काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. डलहौसी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आशा कुमारी या सहा वेळा आमदार झाल्या आहेत. आशा कुमारी या छत्तीसगड सरकारचे आरोग्य मंत्री टीएस सिंह यांची बहीण आहे. यावेळी त्यांना भाजपचे डीएस ठाकूर यांचे आव्हान आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आशा कुमारी यांना 24 हजार 224 म्हणजेच 48.77 टक्के मते मिळाली होती.

Local ad 1